महत्वाच्या तंत्र शैक्षणिक टिप्स
चला तंत्रस्नेही होवूया..!
महत्वाच्या तंत्र शैक्षणिक टिप्स
स्क्रीन शॉट कसा घ्यावा
स्क्रीन शॉट म्हणजे स्क्रीनचा घेतलेला फोटो. तुम्हाला येतो असा फोटो काढता?
खरंतर स्क्रीन शॉट अथवा स्क्रीनचा फोटो घेण्यासाठी कुठल्याही कॅमेर्याची गरज पडत नाही. कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्ट फोनमध्येच काही युक्त्या वापरून तुमच्या डिव्हाईसचा स्क्रीन शॉट घेता येऊ शकतो.
‘स्क्रीन शॉट’ घ्यायचाच कशाला?
१) टेक्नोसॅव्ही जगतामध्ये स्क्रीन शॉटला फार महत्त्व आहे; कारण स्क्रीन शॉटचा वापर करून टेक्नोसॅव्ही मंडळी मोठमोठे प्रॉब्लेम्स सोडवितात. समजा, तुम्ही कॉम्प्युटरवर काम करीत आहात आणि तुमच्या सॉफ्टवेअरनं अचानक एक मोठा तीन-चार ओळींचा एरर मेसेज देत काम थांबवलं तर अशा वेळी तुम्ही काय कराल?
तुम्ही तुमच्या टेक्निकल टीमला तो एरर मेसेज वाचून दाखविता; मात्र तुम्ही वाचून दाखविलेले एक तर समोरच्याला कळत नाही किंवा तुम्ही एरर मेसेज वाचताना काही तरी गडबड करता. अशा वेळी जर त्या एरर मेसेजचा स्क्रीन शॉट घेऊन जर तुमच्या टेक्निकल सपोर्ट टीमला पाठविला तर तो बघून नेमका कुठे प्रॉब्लेम आहे, हे त्यांना चटकन कळेल. लवकरात लवकर सोल्युशन मिळेल.
२) ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन बँकिंग, ऑनलाइन आयटी रिटर्न अशा अनेक गोष्टी आपण ऑनलाइन करतो. त्यातून एक ट्रान्झ्ॉक्शन नंबर जनरेट होतो. त्याचा स्क्रीन शॉट घेऊन डिजिटल कॉपी ठेवली तर प्रिंटिंगचा खर्च वाचेल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तेवढीच मदत.
३) आजकाल स्मार्टफोनचा जमाना आहे. मोठमोठय़ा पर्चेस ऑर्डर ई-मेलऐवजी फक्त छोटासा एसएमएस किंवा व्हॉटस् अँपवरून देण्याचा ट्रेण्ड सुरू झाला आहे. तुम्हाला जर पुरावा म्हणून एसएमएस किंवा व्हॉटस् अँप ठेवायचे असतील तर स्मार्टफोनचा स्क्रीन शॉट घेऊन ठेवू शकता. तुमचा स्मार्टफोन खराब झाला तरी महत्त्वाच्या मेसेज स्क्रीन शॉटच्या रूपानं तुमच्याकडे बॅकअप असतो.
कॉम्प्युटरचा स्क्रीन शॉट कसा घ्याल?
१) स्क्रीन शॉट घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यासाठी काही कीबोर्ड शॉर्टकटस् वापरले जातात. तुमच्या संपूर्ण कॉम्प्युटर स्क्रीनचा स्क्रीन शॉट घ्यायचा असल्यास की बोर्डवरील ‘प्रिंट स्क्रीन’ ही की दाबावी. त्यानंतर ‘पेंट’ ओपन करून त्यामध्ये ‘पेस्ट’ करावे. म्हणजे पूर्ण स्क्रीन इमेज पेंटमध्ये पेस्ट होईल. त्यानंतर त्याला ईमेज म्हणून ‘सेव्ह’ करावं.
तुम्हाला फक्त स्क्रीनवरील अँक्टिव्ह विंडो किंवा डायलॉग बॉक्स कॉपी करायचा असल्यास ‘अल्टर प्लस प्रिंट स्क्रीन‘ दाबून पेंटमध्ये पेस्ट करावं. स्क्रीन शॉट पेस्ट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड, गुगल डॉक्स, पेंट किंवा फोटो शॉप यापैकी काहीही वापरू शकता.
स्क्रीन शॉट अँप्स
की बोर्ड शॉर्टकटऐवजी तुम्ही काही अँप्ससुद्धा कॉम्प्युटर स्क्रीन शॉट घेण्यासाठी वापरू शकता. स्निपिंग टूल्स, जिंग, स्नॅगइट किंवा स्कीच. त्याचप्रमाणे तुम्हाला जर स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं असेल तर त्यासाठी जिंग, अँक्टिव्ह प्रझेंटर (विंडोज) वापरू शकता.
‘अँण्ड्रॉईड’ चा स्क्रीन शॉट
अँण्ड्रॉईड डिव्हाईसेसचा स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्हाला व्हॉल्युम डाऊन आणि पॉवर हे दोन्ही बटण एकाच वेळी दाबावे लागतील. यावेळी फोटो काढल्यासारखा क्लिक असा आवाज होतो आणि तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनचा फोटो घेतला जातो. स्क्रीनशॉट घेतला की तो फोटो गॅलरीमध्ये किंवा फोटो अँपमध्ये सेव्ह होतो.
जर तुमच्या स्मार्ट फोनमध्ये लेटेस्ट अँण्ड्रॉईड ओएस असेल तर त्यामध्ये स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्ही फक्त पॉवर बटण एक-दोन सेकंदांसाठी दाबून ठेवल्यास एक नवीन मेनू स्क्रीनवर येतो आणि त्यामध्ये स्क्रीन शॉट हे ऑप्शन सिलेक्ट केलं जातं.
युनिकोड चा मराठी भाषेत वापर
युनिकोड म्हणजे काय?
युनिकोड हे १६ बिट वैश्विक कॅरेक्टर एनकोडिंग मानक आहे.याचा वापर प्रामुख्याने बहुभाषिक सॉफ्टवेअरचा विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेकडून होतो.युनिकोड मानकामध्ये जगातील सर्व लिखित भाषांची सर्व कॅरेक्टर्स एनकोड करण्याची क्षमता आहे.युनिकोड मानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला विशिष्ट सांख्यिक मूल्य आणि नाव दिले जाते.युनिकोड मानक व आयएसओ १०६४६ मानकाची एक विस्तारित यंत्रणा आहे जिला यूटीएफ-१६ म्हणतात ज्यामध्ये जवळपास दहा लाख कॅरेक्टर्सचे एनकोडिंग करता येते.
एक्सेल फाईल युनिकोडमध्ये कशी कन्व्हर्ट कराल ?
a) प्रथम एक्सेल फाईल टेक्स्ट(.txt) स्वरूपात साठवा.
b) ISM मधील Converter हा पर्याय निवडा.
i) टेक्स्ट(.txt) फाईल बदलणे
(1) प्रथम ISM मधील Converter (बदलणे) हा पर्याय निवडा.
(2) मराठी भाषा हा भाषेमधून पर्याय निवडा.
(3) Input format मधून Bilingual हा पर्याय निवडा.
(4) आपणास Convert करावयाची फाईल (दस्तावेज) उघडा.
(5) Output format मधून युनिकोड हा पर्याय निवडा.
(6) Convert (बदल) झालेली फाईल (दस्तावेज) साठवण्यासाठी आपणास हवे असलेले नाव देऊन हव्या त्या ठिकाणी साठवा.
(7) Convert वर क्लिक करा.
(8) Convert (बदल) झालेली फाईल(दस्तावेज) एक्सेल मध्ये उघडा
पॉवर पाईंट(POWERPOINT)प्रेझेन्टेशन युनिकोड मध्ये कसे कन्व्हर्ट कराल ?
a) प्रथम पॉवर पाईंट (PowerPoint) मधील टेक्स्ट (text) कॉपी करा.
b) ISM मधील Converter हा पर्याय निवडा.
c) टेक्स्ट (text) बदलणे
i) आपणास हवा असलेला टेक्स्ट (text) ISM Converter user interface मधून निवडा.
ii) मराठी भाषा हा भाषेमधून पर्याय निवडा
iii) Input format मधून Bilingual हा पर्याय निवडा.
iv) आपणास हवा असलेला टेक्स्ट (text) इनपूट टेक्स्ट (Input Text) मध्ये लिहा.
v) Output format मधून युनिकोड हा पर्याय निवडा
vi) convert (बदलणे) वर क्लिक(टिचकी) करा
vii) नंतर convert (बदल) झालेला टेक्स्ट (text) नवीन पॉवर पाईंट (PowerPoint) पानावर paste करा
DVB-TT फॉन्ट डेटा युनिकोडमध्ये कसा कन्व्हर्ट कराल?
1. प्रथम वर्ड डॉक्युमेंट उघडा.
2.नंतर Add-Ins वर जा.
3.ISM button वर क्लिक करा.
4.convert हा पर्याय निवडा.
5.Convert To मध्ये युनिकोड हा पर्याय निवडा.
6.convert बट्टन वर क्लिक करा.
टंकलेखन करताना संगणकावर येणारे अनावश्यक शब्द बंद करण्यासाठी उपाययोजना
भारतीय भाषेत टंकलेखन करताना अनावश्यक शब्द संगणकावर येणे हा सामान्य प्रश्न आहे.कृपया ISM मधील खालील सुची तपासा. 1.प्रथम ISM चालू आहे का हे तपासा. 2.ISM सुचीमधील "Font Type" आणि उपयोगाकरिता वापरला जाणारा "Font Type" एकच असला पाहिजे.उदाहरण:जर Devanagari Bilingual Web निवडला असेल तर "Font Type" ,DVBW-TT वापरला पाहिजे. 3.कळफलकावरील script key चालू आहे का हे तपासा. 4.ISM सुचीमधील इतर settings बंद आहेत का ते तपासा. 5.वरील सर्व settings योग्य असूनदेखील अनावश्यक शब्द येत असतील तर ISM व्यवस्थित चालू आहे का ? हे पुढील ठिकाणी तपासा; ISM Menu - Tools - Editor 6.याव्यतिरिक्त आपल्या अडचणीचे समाधान झाले नाही तर कृपया जीस्ट च्या सहयोगी channel partnersशी अथवा पुढील ईमेल वर संपर्क करावाsupport.gist@cdac.in.
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
💻💻अकाउंट हॅक झालंय? परत मिळवा..
>> नॉलेजबुवा
हल्ली प्रत्येकाचा सोशल वावर वाढला आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर असणे नित्याचे झाले आहे. हा वावर वाढल्यामुळे हॅकिंगसारख्या गैरप्रकारांनाही खुले रान मिळाले आहे. फेसबुकचे अकाउंट हॅक होणे ही अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. फेसबुक, जीमेल किंवा ट्विटरचे अकाउंट हॅक झाले, तर त्याचा होणारा गैरवापर महागात पडू शकतो. या पार्श्वभूमीवर हॅकिंगपासून बचाव करण्याच्या या काही उपाययोजना...
'फेसबुक'च्या अकाउंटची 'घरवापसी'
जर तुमचे फेसबुकचे अकाउंट कोणी हॅक करण्याचा प्रयत्न केला असेल, तर ते पुन्हा तुमच्या नियंत्रणाखाली आणणे फारच सोपे आहे. खालीलप्रमाणे कृती केल्यास फेसबुक अकाउंट पुन्हा वापरण्यायोग्य होऊ शकते.
Facebook.com/hacked या लिंकवर जा. तेथे एक बटन दिसेल, ज्यावर My account has been Compromised असे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक स्क्रीन समोर येईल. तेथे पासवर्ड देऊ नका. त्यानंतर Forgotten your passwordवर क्लिक करा.
आता जी स्क्रीन येईल, त्यावर यूजरनेम अथवा ई-मेल किंवा तुमच्या अकाउंटशी जोडलेल्या मोबाइल क्रमांक या तिन्हीपैकी एकाची माहिती द्या. जर हॅक करणाऱ्याने ई-मेल आणि मोबाइल क्रमांक बदलला असेल, तर तुम्ही यूजरनेम टाका. कारण हॅकर यूजरनेम बदलूच शकत नाही.
त्यानंतर फेसबुक तुमच्या अकाउंटला सर्च करून समोर आणेल. आता पासवर्डच्या जागी हॅक करण्यापूर्वीचा किंवा त्या आधीचा पासवर्ड टाका. त्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड टाकण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल.
आता स्क्रीनवर एकापेक्षा अधिक ई-मेलचे पर्याय दिसून येतील. त्यानंतर त्यापैकी कोणत्या ई-मेल आयडीचा वापर करून तुम्ही अकाउंट चालू ठेवणार आहात, या विषयी विचारणा करण्यात येईल. त्यापैकी एक ई-मेल निवडल्यानंतर अन्य ई-मेलमधून तुमचे फेसबुक अकाउंट लॉग इन करण्याची सुविधा काढून घेतली जाईल. त्यानंतर तुम्ही निवडलेला एक ई-मेल आणि नव्या पासवर्डच्या मदतीने फेसबुक पुन्हा कार्यरत ठेवू शकाल.
फेसबुकद्वारा अकाउंट सर्च करून सर्व माहिती समोर आणल्यानंतर जर तुम्ही पासवर्ड देऊ इच्छित नसाल, तर कोणताही पर्याय निवडू नका. तुम्ही फक्त No longer have access to these?वर क्लिक करा. त्यानंतर I can npt access my email account वर क्लिक करा.
त्यानंतर फेसबुककडून How can we reach you? अशी विचारणा करण्यात येईल. त्यानंतर तुम्ही ई-मेल किंवा मोबाइल नंबर द्या. जेणेकरून फेसबुककडून तुम्हाला लिंक पाठविण्यात येईल. त्यानतंर तुम्ही पासवर्ड पुन्हा रिसेट करू शकता. त्यासाठी तुम्ही कोणत्याही परिचिताच्या ई-मेल किंवा मोबाइलच्या क्रमांकाचा उपयोग करू शकता. त्यानंतर व्यक्तिगणिक फेसबुकचा व्यवहार बदलतो. फेसबुकतर्फे विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची कल्पना करू शकत नाही. तुम्ही आतापर्यंत फेसबुकवर केलेल्या अॅक्टिव्हिटिजवर आधारीत प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर तुम्ही त्या प्रश्नांची खरी आणि योग्य उत्तरं दिली तर काही मिनिटांत किंवा काही तासांत तुम्ही दिलेल्या ई-मेल किंवा मोबाइल क्रमांकावर नवीन पासवर्ड पाठवला जातो.
दुर्घटना से देर भली..
अकाउंट हॅक झाल्यानंतर करावा लागणारा दीर्घ द्राविडी प्राणायाम टाळायचा असेल, तर तीन गोष्टींचा कायम अवलंब करा. पहिली गोष्ट म्हणजे लॉग इन करताना मोबाइल व्हेरिफिकेशन करा. (सेटिंगमध्ये जाऊनही हे काम करता येऊ शकते.) दुसरी गोष्ट म्हणजे अकाउंटचा पासवर्ड कधीही सेव्ह करू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या फ्रेंडलिस्टमधील एका व्यक्तीला तुमच्या अकाउंटचा वारसदार बनवून टाका आणि ही माहिती फेसबुकला कळवा. हे देखील सेटिंगमध्ये जाऊन करता येते. त्यानंतर लॉग इन करताना मोबाइलवर आलेला कोड स्क्रीनच्या खालील मोकळ्या जागेवर टाका. जर संबंधित मोबाइल तुमच्याच जवळ असेल, तर दुसरी कुणीही व्यक्ती त्याचा गैरवापर करू शकणार नाही. फेसबुकवर वारसदार नेमल्याने तुमचे अकाउंट हॅक झाले, तरी त्याची माहिती फेसबुकपर्यंत पोहोचवता येऊ शकते. त्यानंतर फेसबुक वारसदाराला नवा पासवर्ड देऊ शकेल.
टिवटिव बंद झाल्यास..
तुमचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यास खालील उपाय वापरून ते नियंत्रणात आणता येऊ शकते.
सर्वप्रथम support.twitter.com/forms/signin या लिंकवर जा.
त्यानंतर were you able to access your account? असा एक पर्याय येईल.
त्यावेळी No असा पर्याय निवडा आणि स्क्रीनवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. जर ड्रॉप डाउनचा फॉर्म आला, तर तेथेही योग्य माहिती द्या.
माहिती आणि प्रश्नांची उत्तरे योग्य दिली, तरच तुमचे हॅक झालेले ट्विटर अकाउंट तुमच्या नियंत्रणात येईल.
हॅकिंगपासून कसे सुरक्षित रहाल?
ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर ते नियंत्रणात आणण्याचा उपाय आपण वर पाहिला. हे सर्व करण्यापेक्षा अकाउंट हॅक न होण्याची खबरदारी घेणे, हा चांगला पर्याय होऊ शकतो.
लॉग इन करताना मोबाइल व्हेरिफिकेशन करा.
पासवर्ड सारखा टाकण्यापासून वाचण्यासाठी बहुतांश मंडळी आपला पासवर्ड सेव्ह करून ठेवतात. ही बाब अत्यंत चुकीची आहे. पासवर्ड सेव्ह करण्यापेक्षा तो लक्षात ठेवण्याची सवय लावून घ्या.
बहुतांश मंडळी ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर ते चालू करण्यापेक्षा नवीन अकाउंट उघडण्याला प्राधान्य देतात.
जीमेल अकाउंट हॅक झाल्यास..
जीमेलचे अकाउंट हॅक झाल्यानंतर ते पुन्हा नियंत्रणात आणण्याचा उपाय वेळखाऊ आणि थकविणारा आहे. असे असले, तरी अवघड मुळीच नाही. जीमेल अकाउंट पुन्हा नियंत्रणात आणण्यापूर्वी किमान खालील माहितीचा आढावा घ्या..
लॉग इन करण्यासाठीचा पासवर्ड काय आहे?
जेव्हा तुम्ही शेवटचे जीमेल अकाउंट कधी, कोठून आणि किती वाजता अॅक्सेस केले आहे?
कोणत्या महिन्यात आणि कोणत्या वर्षी तुम्ही तुमचे अकाउंट उघडले?
तुम्ही तुमच्या ई-मेलवरून वारंवार कोणत्या पाच ई-मेल आयडींवर मेल पाठवले होते?
किमान चार लेबलची नावे.
ब्लॉगर, कॅलेंडर यांसह कोणत्या गुगल उत्पादनांचा तुम्ही वापर केला आहे? त्यांचा वापर नेमका कधी (महिना आणि वर्ष) केला आहे?
तुमच्या ई-मेल खात्याशी जोडलेला मोबाइल क्रमांक.
तुम्ही तुमचे जीमेल अकाउंट का अॅक्सेस करू शकत नाही, त्या विषयीची माहिती.
हे आणि खात्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात येतील. त्यामुळे त्यांची उत्तरे आधी तयार ठेवा.
हॅकमुक्त करण्याचे उपाय..
सर्वप्रथम google.com/accounts/recovery वर क्लिक करा. त्यानंतर समोर येणाऱ्या स्क्रीनवर I don't know my password वर क्लिक करा. तुमचा ई-मेल देऊन Continue वर क्लिक करा.
समोर येणाऱ्या स्क्रीनवर पासवर्ड देण्याऐवजी I Don't know वर क्लिक करा.
त्यानंतर समोर येणाऱ्या स्क्रीनवर तुमचाच दुसरा ई-मेल आयडी द्या. त्यानंतर Continue वर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या समोर येणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.
तुम्ही जर प्रश्नांची योग्य उत्तरे दिलीत, तर तुम्ही दिलेल्या दुसऱ्या ई-मेल आयडीवर नवा पासवर्ड पाठविण्यात येईल.
जर तुम्ही दिलेली माहिती चुकीची असेल, तर गुगलतर्फे पुन्हा तुम्हाला नव्याने माहिती देण्यासाठी सांगण्यात येईल.
खबरदारी हाच बचाव होय..
सोशल नेटवर्किंगवर वावरत असताना खालील बाबींची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
कायम अनोखे पासवर्ड ठेव. आपला वाढदिवस, कुटुंबीयांपैकी कोणाचीही नावे, मोबाइल क्रमांक, मुलांची नावे आदी पासवर्ड ठेवू नयेत. पासवर्डमध्ये विशेष अक्षरांचा वापर करावा. सबंध पासवर्डमध्ये मोठ्या आणि छोट्या लिपितील अक्षरांचाही वापर अवश्य करावा. काही ठरावीक कालावधीनंतर पासवर्ड सातत्याने बदलावा.
पासवर्ड स्वतःपुरताच मर्यादित ठेवा. पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. पासवर्ड मोबाइल अथवा कम्प्युटरवरही दिसेल अशा जागी ठेवू नका.
कोणत्याही ओळखीच्या अथवा अनोळखी व्यक्तीकडून मेल आल्यास पुरेशी खात्री करूनच तो उघडा. कारण अशाप्रकारच्या मेलमध्ये व्हायरस असण्याचीच शक्यता अधिक असते. अशा मेलचा अंदाज न आल्यास ते डिलीट करणे कधीही उत्तम. ज्या व्यक्तीकडून तो आला असेल, त्यालाही या बाबतची माहिती देणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला फेसबुकवर चुकून अश्लील किंवा विचित्र फोटो दिसल्यास त्याला चुकूनही क्लिक करू नका. असे फोटो दिसल्यास Report Abuse या पर्यायाला क्लिक करा. जेणेकरून अशा फोटोंविषयी फेसबुककडे रितसर तक्रार नोंदवली जाईल.
फेसबुकचा वापर करताना प्रायव्हसी सेटिंग अशी ठेवा की कुणीही अनोळखी व्यक्ती तुमच्या वॉलवर पोस्ट करू शकणार नाही. किंवा तुम्ही टाकलेली पोस्ट पाहू शकणारही नाही.
जर हॅकरने व्यक्तीचे फेसबुक अकाउंट किंवा ई-मेल हॅक केला असेल, तर त्याची तक्रार पोलिसांकडे अथवा सायबर क्राइमकडे देणे आवश्यक आहे.
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
💻💻ही अॅप्स तुमच्याकडे आहेत का?
टेक्नोकांत
भारतात सुमारे १६ कोटी स्मार्टफोन युजर्स आहेत. तसेच अँड्रॉइड, विंडोज अशा सर्व प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीमची मिळून जवळपास तीस लाख अॅप्स उपलब्ध आहेत. सगळीच अॅप्स कमी-अधिक प्रमाणात उपयुक्त आहेतच. त्यापैकी काही अॅप्सची ही तोंडओळख...
ट्रू-मेसेंजर :(अँड्रॉइड)
एखादा जंक मेल इनबॉक्समधून स्पॅम फोल्डरला कशा प्रकारे आपोआप पाठवला जातो, याची तुम्हाला कल्पना असेलच. ट्रू-मेसेंजर हे अॅप वापरले, तर हीच सुविधा एसएमएसच्या बाबतीत उपलब्ध होते. त्यासाठी सुरुवातीला तुमच्या मोबाइलवर हे अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागते. त्यानंतर फोनचे डिफॉल्ट एसएमएस अॅप म्हणून हे अॅप्लिकेशन ठेवावे लागते आणि त्यातील काही प्रकारचे एसएमएस 'स्पॅम' म्हणून 'मार्क' करावे लागतात. कालांतराने जंक मेसेज कोणते ते अॅपला आपोआपच कळेल आणि ते एसएमएस रिसिव्ह झाल्यानंतर लगेचच स्पॅम फोल्डरमध्येच जातील. तुम्ही स्वतःही हेच काम करू शकता, तसेच चुकून स्पॅममध्ये गेलेला उपयुक्त मेसेज तुमच्या इनबॉक्समध्येही पाठवू शकता. पाठवलेला मेसेज थांबवण्याची पाच सेकंदांपर्यंतची क्षमताही हे अॅप 'अनसेंड' बटणाच्या माध्यमातून देते. तसेच 'ट्रू-कॉलर'च्या टीमनेच हे अॅप बनवलेले असल्याने अज्ञात नंबरवरून आलेला मेसेज पाठवणाऱ्याचे नावही आपल्याला कळू शकते. अर्थात, त्यामुळे तुमचे नावही या अॅपच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचते, याची मनाशी खूणगाठ बांधायला हवी.
स्मार्टस्पेंड्स :(अँड्रॉइड)
तुमचा जमा-खर्चाचा हिशेब व्यवस्थित राखण्यासाठी शिस्तीची आवश्यकता असते. त्याकामी मदत करणारे एक अत्यंत उपयुक्त अॅप्लिकेशन म्हणजे स्मार्टस्पेंड्स. तुमच्या जमा-खर्चाचा हिशेब आपोआप राखण्याचे काम हे अॅप करते. तुमची बँक, ऑनलाइन रिटेलर्स, क्रेडिट कार्ड, व्यापारी यांच्याकडून तुमच्या मोबाइलवर येणारे मेसेज हे अॅप्लिकेशन वाचते. (म्हणजे त्यातील खर्च किंवा उत्पन्नाशी निगडीत आकडे वाचते. तुमची बँकेची कोणतीही गोपनीय माहिती किंवा पासवर्ड हे अॅप विचारत नाही.) त्या मेसेजच्या स्वरूपानुसार संबंधित रकमेचे आपोआप जमा किंवा खर्चाच्या प्रकारात वर्गीकरण केले जाते. खर्च असेल, तर तो एंटरटेन्मेंट, ग्रोसरी, बिल्स अशा वेगवेगळ्या स्वरूपात वर्गीकृत केला जातो. त्यामुळे तुम्ही आठवडाभरात किंवा महिन्यात कशासाठी किती खर्च केला, हे आपोआप तुम्हाला पाहायला मिळते. त्याचे चार्टही पाहता येतात. बिल भरण्याचे रिमाइंडर लावता येतात. तुमच्याकडे असलेल्या कोणत्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर कोठे एखादी ऑफर किंवा डिस्काउंट असेल, तर त्याचीही माहिती दिली जाते. त्यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात. अर्थात यात तुम्हाला तुमच्या रिसिट फोटो काढून जोडता येत नाहीत. त्यासाठी तुम्हाला 'वॉलनट' हे अॅप उपयोगी ठरू शकते.
इनशॉर्ट्स : (अँड्रॉइड, आयओएस)
तुम्हाला वेबसाइट किंवा वृत्तपत्रांतील बातम्या वाचणे शक्य नसेल, तर इनशॉर्ट्स हे अॅप जरूर वापरा. हे अॅप भारतीय वाचकांसाठी दखल घेण्यासारख्या बातम्या केवळ ६० किंवा त्याहून कमी शब्दांत उपलब्ध करून देते. त्यासाठी त्यांनी संपादकांची स्वतंत्र टीम नेमली आहे. नेमकी वस्तुस्थिती, घटनेचा कालावधी एवढीच माहिती वाचता येते. अधिक माहिती हवी असेल, तर पूर्ण मोठे आर्टिकलही उपलब्ध असते. नको असेल, तर पुढची बातमी वाचण्यासाठी आपण स्वाइप करू शकतो. इंग्रजी आणि हिंदी भाषांतील बातम्या येथे उपलब्ध असतात. मराठी, बांगला, गुजराती, मल्याळम, पंजाबी, ऊर्दू, इंग्रजी आणि हिंदी या भाषांतील वेगवेगळ्या स्रोतांतील बातम्या वाचण्यासाठी डेलीहंट (आधीचे न्यूजहंट) हेही अॅप चांगले आहे.
हेप्टिक :(अँड्रॉइड, आयओएस)
हे अॅप्लिकेशन म्हणजे तुमचा जणू पर्सनल असिस्टंटच आहे. तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही या अॅपला विचारू शकता. त्यासाठी काहीही टाइप करण्याची गरज लागत नाही. तुम्हाला मुंबईहून कूर्गला कसे जायचे हे विचारायचे असेल किंवा फ्रिज दुरुस्तीसाठी स्थानिक तंत्रज्ञ शोधायचा असेल, तर यापैकी कोणतेही काम तुम्ही 'हेप्टिक'ला विचारू शकता.
टॅक्सी : (अँड्रॉइड)
तुम्ही असलेल्या ठिकाणापासून सर्वांत जवळ असलेली आणि कमीत कमी दरात उपलब्ध असलेल्या टॅक्सीची माहिती हे अॅप्लिकेशन देते. उबर, ओला कॅब्ज, टॅक्सी फॉर शुअर यांसारख्या सेवांची माहिती ट्रॅक करून तुम्हाला एकत्रित माहिती पुरवली जाते. त्यामुळे सर्वांत जवळ आणि सर्वांत स्वस्त अशा दोन कॉलममध्ये टॅक्सीची माहिती पुरवली जाते. प्रवासाला लागणारा वेळही कळतो. दिल्ली, मुंबई, पुणे, गोवा, बेंगळुरू, कोलकाता, कोची, भोपाळ, चंडीगड, सुरत अशा ५२ शहरांत हे अॅप्लिकेशन वापरता येते.
पिनकोड : (अँड्रॉइड)
देशांतर्गत पिनकोड, एसटीडी कोड नंबर, वाहनांचे नंबर, बँक आयएफएससी कोड, विविध कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक, पीएनआर स्टेटस अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्रमांक आपण या अॅप्लिकेशनच्या साह्याने शोधू शकता.
हेल्दीफाय मी : (अँड्रॉइड, आयओएस)
तुम्ही सेवन केलेल्या कॅलरींचा हिशेब ठेवण्याचे काम हे अॅप्लिकेशन करते. तुमची उंची, वय आणि वजनाची माहिती अॅपमध्ये भरावी लागते. त्यानंतर तुम्ही खाल्लेल्या पदार्थाचे नाव त्यात टाकले, की किती कॅलरी तुमच्या पोटात गेले, याची माहिती मिळते. तुम्हाला किती कॅलरी खाणे गरजेचे आहे, हेही त्यात दिसते. तुमची जीवनशैली आरोग्यपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने व्यायाम सुचवण्याचे कामही हे अॅप करते.
रेलयात्री : (अँड्रॉइड, आयओएस)
तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल, तर संबंधित सर्व प्रकारची माहिती रेलयात्री या अॅपवर उपलब्ध आहे. पीएनआर स्टेटसपासून रेल्वे नकाशावर रिअल टाइम ट्रॅक करण्यापर्यंत अनेक गोष्टी तुम्ही करू शकता. रेल्वेकडून प्रसिद्ध होणारी अधिकृत निवेदने, भारतातील रेल्वेची सगळी वेळापत्रके, बर्थ पोझिशन आणि कोच लेआउट, सीट अव्हेलॅबिलिटी, टॅक्सी किंवा फूड बुकिंग अशा अनेक सेवांची माहिती त्यात मिळते. मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई यांसारख्या शहरांतील
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
🎯RSS feed आणि गुगल रीडर
अभिजीत वैद्य
जर तुम्ही इंटरनेट वापरत असाल आणि बरेच ब्लॉग्स, वेबसाईट्स वाचत असाल, तर त्या त्या साईटवर नवीन माहिती आली आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही काय करता ?
साईट्स बुकमार्क्स करून प्रत्येक वेळी सर्व साईट्स उघडून बघणे हा एक पर्याय आहे. पण त्याचे बरेच तोटे आहेत. एका संगणकाच्या browser वर सेव्ह केलेले बुकमार्क्स तुम्हाला दुसऱ्या संगणकावर पाहता येत नाहीत. बरेचसे ब्लॉग्स अनियमितपणे अपडेट्स होतात. त्यामुळे एखादी साईट उघडल्यावर जुनीच पोस्ट दिसण्याचा प्रकार बरेचदा दिसतो. इंटरनेटचा स्पीड कमी असल्यास वेळ आणि bandwidth दोन्ही वाया जाते.
दुसरा पर्याय म्हणजे इमेलद्वारा सबस्क्रीप्शन. हा एका चांगला पर्याय असला तरी याचेही काही तोटे आहेत. एक म्हणजे तुम्ही वाचत असलेल्या सगळ्याच साईट्सवर हा पर्याय असतो असे नाही. आणि बरेचदा अश्या ठिकाणी मेलआयडी दिल्यावर स्पॅममेल्सच जास्त येण्याची शक्यता असते.
तिसरा पर्याय म्हणजे आर.एस.एस. फीड द्वारा अपडेट्स मिळवणे.
RSS (Really Simple Syndication) हा वेबसाईट कडून अपडेट्स मिळवण्याचा एक format आहे. तुम्ही साईटच्या RSS feeds ला सबस्क्राइब केले की तुम्हाला प्रत्येक वेळी साईटवर जाऊन अपडेट्स बघण्याची गरज नाही. साईटवर जेंव्हा नवीन पोस्ट्स येतील तेंव्हा ते अपडेट्स तुम्हाला तुमच्या RSS feed reader मध्ये मिळतील. RSS reader मधून तुम्ही सबस्क्राइब केलेल्या सर्व साईट्स चे अपडेट्स एकाच User interface मध्ये दिसतात. त्यामुळे एकाद्या ब्लॉगवरील फॉंट अथवा background कलर आवडत नसेल तरी काही फरक पडत नाही.
गुगल रीडर हि गुगलची RSS feed reader ची सर्व्हिस आहे. गुगल च्या account ने तुम्ही यावर लॉग-इन करू शकता. लॉग-इन केल्यावर डाव्या बाजूला असलेल्या “Add Subscription” मध्ये तुम्हाला हव्या असलेल्या साईटची URL टाकले की झाले. त्या साईटवर होणारे सगळे अपडेट्स तुम्हाला गुगर रीडर वर कळवण्यात येतील. गुगल रीडरवर नवीन फीड्स शोधण्याचीसुद्धा सोय आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयाचे नवीन ब्लॉग्स, साईट्स शोधू शकता.
______________________________________________________
🎯विडिओ निर्मिती पद्धती:::-
http://www.videosoftdev.com/free-video-editor/download
🎯🎯ऑफ़ लाइन व् ऑन लाईन application तयार करण्याची पद्धती.
http://www.appsgeyser.com/mobile/
🎯🎯ब्लॉगिंग विकास पद्धती
https://www.blogger.com
🎯वेब साईटस तयार करण्याची पद्धती
http://myidealshool.blogspot.in/
🎯🎯माहिती तंत्रज्ञानातुन एक्सपर्ट इंटरनेट वापरसाठी नव नविन गुगल प्रोडक्ट माहिती:-
https://developers.google.com/products/
आदरणीय ग्रुप नमस्कार,Laxman Wathore facebook/whatsapp ग्रुप कार्यतत्पर.गेल्या रविवारी राज्यातील सर्व whatsapp ग्रुपवरील आपल्या महाराष्ट्रराज्यातील शिक्षक बंधू-भगिनी माहिती तंत्रज्ञान जन जागृती करण्यसाठी दिलेली संधी त्या बद्दल सर्वांचा आभारी आहे.आज ही आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन व सहकार्यतून Application development अनेक वेबसाईटस बद्दल माहिती सादर करीत आहे. आज इंटरनेटवर अनेक वेबसाईटस व सर्वरच्या माध्यमातून अॅप्लिकेशन development करणे अतिशय सोपे झाले आहे. खालील काही महत्वपूर्ण १०० फ्री वेबसाईटस च्या मदतनी स्वताचे भावना,कल्पना,विचार,कृती,आवडी निवडी,अनुभव विश्व,प्रयत्न सातत्यतून व कल्पने प्रमाणे उत्कृष्ट अनुप्रयोग तयार करून अध्ययन-अध्यापन साहित्य निर्मितीसाठी वापर करता येतो. :
::Application development काही उत्कृष्ट वेब सर्वर साईटस लिंक खालील प्रमाणे:::
👉 appsgeyser
http://www.appsgeyser.com/
👉 andromo
http://www.andromo.com/
👉 appmachine
http://www.appmachine.com/
👉 appmakr
https://www.appmakr.com/
👉 theappbuilder
http://www.theappbuilder.com/
👉 como
http://www.como.com/
👉 mobincube
http://www.mobincube.com/
👉 octopusapps
https://octopusapps.com/en/
👉 appsbar
http://www.appsbar.com/
वरील प्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी ने जास्तीत जास्त appsgeyser ह्या वेब साईटस सर्वरचा अतिशय चांगला उपयोग करून हजारो अॅप्लिकेशन तयार केले आहेत. कारण appsgeyser हे १०० फ्री युजर असून वापरण्यास एकदम सोपे आहे.नवीन शिकणारे व्यक्तीस ही कमी माहिती तंत्रज्ञान अवगत असतांना ही काहीच मिनिटांत उत्कृष्ट अॅप्लिकेशन तयार करता येते. शिवाय विनामूल्य अॅप्लिकेशन तयार करता येतात हे पण फार चांगले आहे. हे मात्र अॅप्लिकेशन play store करण्यसाठी चार्जेस आहेत. विना play store १०० टक्के फ्री पब्लिसिंगसाठी अनेक शिक्षक बंधू भगिनी ने आता स्वत ब्लॉग साईटसचा अतिशय चांगला वापर केला आहे. त्या पद्धतीने ही वापर करता येईल. असे पद्धतीने विनामुल्ये आपल्या विचार,कल्पना,भावना,कृती अॅप्लिकेशन माध्यमातून तयार करून उत्कृष्ट अध्ययन-अध्यापन साहित्य तयार करता येते.
👉 १.खालील लिंक- १०० फ्री template वापर करून यावरून आपल्याला ब्लॉग्ज किंवा वेबसाईटसचे अॅप्लिकेशन तयार करता येते.
http://www.appsgeyser.com/create-url-app/
👉 २.खालील लिंक १०० फ्री template वापर करून whatsapp सारखे मेसेंजर अॅप्लिकेशन तयार करता येते.मात्र वरील अॅप्लिकेशन publishing साठी telegram कंपनी FAQ परवानगी आवश्यक आहे.
http://www.appsgeyser.com/create-messenger-app/
👉 3.खालील लिंक १०० फ्री template वापर करून आपल्याला आवडी प्रमाणे टेक्स्ट कोडींग अॅप्लिकेशन तयार करता येते.
http://www.appsgeyser.com/ create-text-app/
👉 ४.खालील लिंक १०० फ्री template वापर करून आपल्या आवडी प्रमाणे बहुपर्याय प्रश्नाचे अॅप्लिकेशन तयार करता येते.
http://www.appsgeyser.com/create-quiz-app/
👉 ५.खालील लिंक १०० फ्री template वापर करून आपल्या आवडी प्रमाणे . PDF 2. DOC, DOCX, 3. PPT , PPTX अॅप्लिकेशन तयार करता येते.
http://www.appsgeyser.com/create-docs-app/
👉 ६.खालील लिंक १०० फ्री template वापर करून आपल्या आवडी प्रमाणे युट्यूब विडीओज अॅप्लिकेशन तयार करता येते.
http://www.appsgeyser.com/create-youtubePlus-app/
👉 ७.खालील लिंक १०० फ्री template वापर करून आपल्या आवडी प्रमाणे आपल्या भावना,कल्पना,विचार,कृती,संकल्पना अध्ययनव अध्यापन सुलभता या संदर्भात अॅप्लिकेशन तयार करता येतात.
http://www.appsgeyser.com/create/start/#all-templates
👉 आदरणीय ग्रुप आपल्या काही शिक्षक बंधू-भगिनीना माहिती तंत्रज्ञान वापरातील टेक्निकल अडचणी असल्यास teamviewer हे सॉफ्टवेअरचा वापर परस्पर सहकार्यसाठी अतिशय चांगला उपयोग करता येतो गेल्या काही वर्षा पासून ह्या teamviewer हे सॉफ्टवेअर मुळे अनेक स्वदेशी व विदेशी बंधू-भगिनीची मदत घेण्यात व देण्यात मला ही अतिशय चांगला उपयोग झाला आहे.https://www.teamviewer.com/en/download/windows.aspx
👉 आदरणीय ग्रुप आज आपल्या महाराष्ट्र मध्ये अनेक आपले शिक्षक-बंधू भगिनी करीत असेलेले शैक्षणिक कार्य अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. कधीही कोणतेही कार्य करीत असतांना सतत सकारात्मक व निस्वार्थवृत्तीने केल्यास त्या कार्याचा आनंद हा एखाद्या पुरस्कार किंवा बक्षीसा पेक्षा ही फार मोठा असतो. लक्षात ठेवा विचार हा हेतूकडे नेतो, हेतू हा कृतीकडे नेतो, कृतीमुळे सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनत जातो, स्वभावामुळे साध्य प्राप्त होते, साध्य म्हणजे विचार होय. कारण विचार ही यशाची पहिली पायरी आहे. शिक्षण व समाजकार्य करीत असतांना आपल्यातील मी पणा कमी करून आपणपणा आणून निस्वार्थवृत्तीतून केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्यतून आदर्श व्यक्तीमत्व बनते हेच सत्य आहे. नमो सत्य जय हिंद !!! ही पोस्ट सर्व ग्रुपवर शेअर करून विद्यादान करा आपण सारे शिकूया पुढे जाऊ या !!!
____________________________________________________________________________________________________________
🎯🎯तंत्रज्ञानाच्या दुनियेतील टॉप १० उपकरणे
Maharashtra Times | Sep 20, 2015, 12.11 AM IST
'कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक आणि अप्लायन्सेस'च्या जगातील मोठ्या प्रदर्शनापैकी एक असलेले 'आयएफए' हे प्रदर्शन बर्लिनमध्ये १९२४पासून भरवले जाते. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असते आणि या प्रकारापैकी फार जुन्या असलेल्या प्रदर्शनांपैकी ते एक आहे. या प्रदर्शनाला उपस्थित राहण्यासाठी हितेश राज भगत यांना 'लेनोव्हो'तर्फे आमंत्रित करण्यात आले होते. या प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या काही उपकरणांविषयी त्यांनी दिलेली ही माहिती...
लेनोव्हो योगा टॅब थ्री प्रो
लेनोव्होकडून सादर झालेल्या 'योगा टॅब थ्री प्रो'मध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत. या टॅबमध्ये 'बिल्ट-इन' प्रोजेक्टर असून, त्याद्वारे ७० इंच स्क्रीनवर प्रोजेक्शन करता येते. प्रोजेक्टर लेन्स अत्यंत योग्य जागी बसवण्यात आली असून, प्रोजेक्शन करताना डिस्प्ले सरळ राहू शकतो. या टॅबचा स्क्रीन १०.१ इंच असून (२५६० बाय १६०० पिक्सेल्स), क्वाड कोअर इंटेल अॅटम प्रोसेसर आहे. या टॅबला दोन जीबी रॅम असून, १६ किंवा ३२ जीबी स्टोअरेज क्षमता आहे. मुख्य म्हणजे याची बॅटरी १०,२०० एमएएच क्षमतेची असून, त्यामुळे एकदा चार्ज केल्यानंतर ती १८ तास चालते. याला समोरच्या बाजूला चार जेबीएल स्पीकर असून, ऑडिओच्या उत्तम अनुभवासाठी डॉल्बी अॅटमॉस्फिअरचा पर्यायही देण्यात आला आहे. सातशे ग्रॅमपेक्षा कमी वजन, अॅल्युमिनिअम बॉडी, वाढवता येणारी मेमरी, लेदर फिनिश बॅक पॅनेल आणि १३ व ५ मेगापिक्सेलचे कॅमेरे ही या टॅबची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.
एसर प्रिडेटर एट
एसरची प्रिडेटर सीरिजमधील उत्पादने गेम खेळणाऱ्यांना डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आलेली आहेत. प्रिडेटर एट या टॅब्लेटद्वारे एसर ही कंपनी आता मोबाइल गेमर्सवर आपले लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. हा नव्याने सादर करण्यात आलेला टॅब्लेट आठ इंची (१९२० बाय १०८० पिक्सेल्स) असून, त्याचे वजन ३५० ग्रॅम आहे. या स्क्रीनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची कलर गॅमट अॅक्युरसी १०० टक्के आहे. त्याच्या चार कोनांवर असलेले रेड ग्रिल्स केवळ डिझाइनचा भाग नाहीत, तर ते फ्रंट फेसिंग स्पीकर्स असून, गेम खेळताना व्हर्च्युअल सराउंड साउंडचा अनुभव येण्यासाठी ते तसे डिझाइन करण्यात आले आहेत. इंटेल अॅटम एक्स सेव्हन या प्रोसेसरसह आलेला हा पहिलाच टॅब्लेट असून, तो 'मायक्रोसॉफ्ट सरफेस थ्री'मध्येही वापरण्यात आला आहे. दोन जीबी रॅम, ३२ जीबी रॉम ही अन्य फीचर्स आहेत. एसरच्या टॅकसेन्स या तंत्रज्ञानामुळे गेम खेळताना गेम कन्सोल कंट्रोलरप्रमाणे व्हायब्रेशनचा अनुभव येतो.
लेनोव्हो थिंकपॅड योगा
थिंकपॅड हे लेनोव्होच्या लिजंडरी बिझनेस लॅपटॉपना देण्यात आलेले नाव आहे. 'आयबीएम'चा पीसी बिझनेस विकत घेतल्यानंतर हे नावही सोबत आले. कंपनीच्या विविध लवचिक (फ्लेक्झिबल) उपकरणांना योगा हे नाव देण्यात आले आहे. योगा लॅपटॉपचा स्क्रीन वेगवेगळ्या दिशांमध्ये फिरवता येतो आणि त्याचा लॅपटॉप, टॅब्लेट किंवा टेबलटॉपसारख्या अन्य स्वरूपांत वापर करता येतो. उत्तम स्पिल रेझिस्टंट कीबोर्ड, ट्रॅकपॉइंट ही त्याची वैशिष्ट्ये. थिंकपॅड योगा २६० (१२.५ इंच स्क्रीन) आणि थिंकपॅड योगा ४६० (१४ इंच स्क्रीन) अशा दोन व्हर्जन त्यात आहेत.
सॅमसंग गिअर टू
सॅमसंगच्या गिअर या स्मार्टवॉच मालिकेतील गिअर टू हे गोल डिस्प्ले असलेले हे पहिलेच स्मार्टवॉच आहे. हे वॉच सॅमसंगच्याच टायझेन सिस्टीमवर चालते. १.२ इंचाचा सुपर अॅमोएलईडी डिस्प्ले असून, ३६० बाय ३६० पिक्सेलचे रिझॉल्युशन आहे. डिस्प्लेभोवती असलेल्या फिरणाऱ्या बिझेलचा उपयोग नेव्हिगेशनसाठी होतो. हे स्मार्टवॉच केवळ सॅमसंगच नव्हे, तर कोणत्याही अँड्रॉइड फोनसोबत वापरता येते. १.० गिगाहर्ट्झचा ड्युएल कोअर प्रोसेसर, ५१२ एमबी रॅम, चार जीबी स्टोअरेज आणि २५० एमएएच क्षमतेची बॅटरी ही वैशिष्ट्ये आहेत. चार्ज केलेली बॅटरी तीन दिवस चालते, असा दावा आहे.
सोनी एक्स्पेरिया झेड फाइव्ह प्रीमिअम
सोनी कंपनीने एक्स्पेरिया झेड फाइव्ह अंतर्गत एक्स्पेरिया झेड फाइव्ह, झेड फाइव्ह कॉम्पॅक्ट आणि झेड फाइव्ह प्रीमिअम असे तीन फोन लाँच केले आहेत. त्यापैकी प्रीमिअम हा फोन सादर करण्यात आला आहे. फोर के रिझॉल्युशन डिस्प्ले (३८४० बाय २१६० पिक्सेलसह ५.५ इंच) असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. त्यामुळे ८०६ पीपीआयची अत्यंत सुंदर पिक्सेल डेन्सिटी आहे. स्टेनलेस स्टील फ्रेम, धूळ आणि पाण्याला प्रतिबंध, तसेच फेज डिटेक्सन ऑटोफोकससह २३ मेगापिक्सेलचा मागचा कॅमेरा, तसेच फोर के व्हिडिओ रेकॉर्डिंग, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसर, तीन जीबी रॅम, ३२ जीबी स्टोअरेज, ३४३० एमएएच बॅटरी, ही याची काही वैशिष्ट्ये.
लेनोव्हो आयडियापॅड एमआयआयएक्स ७००
'एमआयआयएक्स ७००' हा 'सरफेस थ्री'चा क्लोन करण्याचा लेनोव्होचा प्रयत्न आहे. मागचा किकस्टँड आणि मॅग्नेटिक कीबोर्ड डॉक ही फीचर्सही त्यात आहेत. यातील किकस्टँड स्क्रीनला कोणत्याही अँगलमधून सपोर्ट देऊ शकतो. इंटेल कोअर एम सेव्हन प्रोसेसर, आठ जीबी रॅम, २५६ जीबी एसएसडी, २१६० बाय १४४० पिक्सेल्स असलेला १२ इंच टचस्क्रीन, ७८० ग्रॅम वजन (कीबोर्ड डॉकसह), पाच-पाच मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे, ३.० आणि २.०चे यूएसबी पोर्ट, मायक्रोएसडी, मायक्रो एचडीएमआय आउटपुट, डेटा कनेक्टिव्हिटीसाठी मायक्रो सिम स्लॉट ही याची काही वैशिष्ट्ये आहेत. याची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर नऊ तास चालेल असा दावा लेनोव्होने केला आहे.
एसर रेव्हो बिल्ड एम १-६०१
हा जगातील पहिला संपूर्णपणे मॉड्युलर डेस्कटॉप पीसी असून, काही सेकंदांत तो अपग्रेड करता येतो. इंटेल प्रोसेसर, इंटेल एचडी ग्राफिक्स, आठ जीबीपर्यंतची रॅम ही याची काही वैशिष्ट्ये. प्रत्येकी तीन टीबीचे एक किंवा अनेक हार्ड ड्राइव्ह ब्लॉक तुम्ही त्याला वर जोडू शकता. प्रत्येक ब्लॉक पिनच्या साह्याने चुंबकीय पद्धतीने जोडता येतो. तुम्हाला हवे तितके ब्लॉक जोडता येतात. बिल्ट इन बॅटरीसह असलेला वायरलेस चार्जिंग ब्लॉक, स्पीपर ब्लॉक आणि पायको प्रोजेक्टर ब्लॉकही याला जोडता येतो.
रिकोह थेटा एस
अगोदरच्या थेटा एम १५ या कॅमेरा मॉडेलमध्ये असलेल्या त्रुटी यात दूर करण्यात आल्या आहेत. याद्वारे ५३७६ बाय २६८८ या रिझॉल्युशनचे फोटो काढता येतात. १०८० पिक्सेलचा व्हिडिओ ३० फ्रेम प्रति सेकंद या दराने चित्रित करता येतो. आठ जीबीपर्यंतची स्टोअरेज क्षमता असून, व्हिडिओ क्लिपची लांबी २५ मिनिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
एसस जीएक्स ७००
वॉटर कूलिंग यंत्रणा असलेला हा लॅपटॉप आहे. हे फीचर फार दुर्मीळ आहे. ही यंत्रणा काढून ठेवता येते. जेव्हा भरपूर काम असेल आणि कम्प्युटरकडून स्थिरपणे छान काम करून हवे असेल, तेव्हा ही यंत्रणा सुरू ठेवावी, अन्य वेळी पोर्टेबिलिटीसाठी ती काढून ठेवता येते.
तोशिबा सॅटेलाइट रेडिअस १२
लेनोव्होच्या 'योगा'प्रमाणेच रेडिअस १२ हे उपकरणही लॅपटॉप, टेबलटॉप किंवा टॅब्लेट अशा कोणत्याही स्वरूपात वापरता येते. 'रेडिअस १२'ला फोर के स्क्रीन (३८४० बाय २१६० पिक्सेल्स) असून, असे फीचर असलेले हे पहिले कन्व्हर्टिबल उपकरण आहे. रंग अतिशय उत्तम तऱ्हेने दिसणे हे याचे वैशिष्ट्य. लेटेस्ट सिक्स्थ जनरेशन इंटेल कोअर प्रोसेसर्स यात असून, विंडोज हॅलोही त्यात आहे. (लॉगिनसाठी चेहरा वापरण्याचे फीचर)
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा
____________________________________________________________________________________________________________
🌷🌷चला तंत्रस्नेही बनु या 🌷🌷
🎯🎯सौजन्य : श्री लक्ष्मन वाठोरे सर ,
🎯Whatsapp दुहेरी वापर🎯
आदरणीय ग्रुप नमस्कार,Laxman Wathore ग्रुप पोस्ट कार्यतत्पर
🎯🎯 आज आपण- whatsapp चा -Android व PC असा दुहेरी वापर करण्यची नवीन पद्धती शिकणार आहोत. 🎯🎯
आपल्या शिक्षक बंधू-भगिनी जवळ Android मोबाईल व PC हे दोन्ही साधन उपलब्ध असतील त्यांच्यासाठी खालील वेबलिंक कॉपी करून आता संगणकावर वर whatsApp Messenger हे अॅप्लिकेशन वापरण्याचे माहिती तंत्रज्ञान इंटरनेट वापरातील ही नवीन पद्धतीचा वापर करून स्मार्ट वर्किंग मध्ये गतिमानता आणणेसाठी खालील माहिती ग्रुप शेअर करीत आहे.
https://web.whatsapp.com/
🎯🎯 वरील लिंकवर जाऊन हा वेब URL संगणकवर वापर करा.आता तुमच्या Android मोबाईलवरील whatsapp अॅप्लिकेशनवर open करा. त्या मध्ये left क्लिक मध्ये settings,status, असे functions बटन आहेत त्यातील whatsApp Web हे Option आहे त्यावर क्लिक करा. whatsApp Web हे Option बटन आपल्या अॅप्लिकेशन मध्ये नसेल तर त्यासाठी एक मार्ग आहे Play Store वर जाऊन whatsApp Messenger हे अॅप्लिकेशन update करावे लागेल. ते update झाल्यावर whatsApp Web हे Option बटन add झालेले असेल. आता त्यावर क्लिक करा.
🎯🎯 आता वरील वेब URL म्हणजे https://web.whatsapp.com/ हा PC वर ओपन करा.Android मोबाईलवरील whatsApp Web हे बटन क्लिक केल्यावर visit web.whatsapp.com on your computer and scan the QR code या PC वरील QR code जवळ धरून योग्य प्रकारे scan करा. या वेबसाईटचा हा QR code कोड व्यवस्थित पणे scan झाल्यास आता तुमचे whatsapp Messenger हे अॅप्लिकेशन दुहेरी वापर करू शकता. मात्र दोन्हीकडे इंटरनेट असणे आवश्यक आहे. स्मार्ट फोन व PC असा देहुरी वापर केल्यामुळे नेट डेटा दोन्ही कडे जाते असे काही नाही. यामुळे डेटा बचत होणार आहे. अनेक शिक्षक बंधू भगिनी अतिशय उपयोगी माहिती शेअर करीत असतात ती सर्व माहिती PC वर Save करण्यात अतिशय चांगली मदत होणार आहे. ही माहिती आपल्या सर्व शिक्षक-बंधू भगिनीच्या whatsapp ग्रुपवर शेअर करून विद्या दान करा. आपण सारे शिकुया पुढे जाऊ या. आपल्या मराठी शाळेच्या विकासात गतिमानता अनुया नमो सत्य जय हिंद !!!
____________________________________________________________________________________________________________
🎯🎯आता खुशाल विसरा पासवर्ड
Maharashtra Times | Sep 23, 2015, 05.00 AM IST
हितेश वैद्य, कॉलेज क्लब रिपोर्टर, मुंबई
कम्प्युटर असो, इंटरनेट असो, मोबाइल असो... या व्यवहारांचे पान पासवर्डखेरीज हलत नाही. मात्र मायक्रोसॉफ्टने हा पासवर्डच हद्दपार करण्याचे ठरवले असून, विंडोज १०मध्ये मायक्रोसॉफ्टने अकाऊण्ट लॉगइन करण्यासाठी विंडोज हॅलो हे अनोखे फिचर उपलब्ध करून दिले आहे.
'विंडोज बिझनेस ग्रुप'चे संचालक विनीत दुरानी यांनी मंगळवारी याबाबतची माहिती येथे दिली. विंडोज हॅलोमध्ये 'फेस रेकग्निशन' आणि 'बायोमेट्रिक स्कॅनिंग' वापरून अकाऊंटचे कुलुप उघडले जाईल. कम्प्युटर वा मोबाइलमधील डेटा सुरक्षित राखण्यासाठी ही नवी पद्धती अधिक परिणामकारक ठरेल, असा विश्वास दुरानी यांनी व्यक्त केला. अनेकजण पासवर्ड लक्षात रहावा, यासाठी तो खूपच सोपा ठेवतात. अनेकदा पासवर्ड विसरण्याचेही प्रसंग येतात. त्यावर हा उत्तम उपाय ठरेल.
सुरक्षेचे इतरही अनेक पर्याय या सिस्टीममध्ये देण्यात आले आहेत. या सिस्टीमसाठी लागणारे हार्डवेअर (फिंगरप्रिंट रीडर, आयआर किवा बायोमेट्रिक सेन्सर्स) अद्याप सगळे मोबाइल वा कम्प्युटरमध्ये उपलब्ध नसल्याने ही नवीन पद्धत प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी आणखीन काही काळ जावा लागेल.
दुरानी यांनी यावेळी विंडोजच्या भविष्याताली वाटचालीची कल्पना दिली.
विंडोज १० हे विंडोजचे शेवटचे व्हर्जन असेल. फक्त लिनक्सप्रमाणे विंडोजचे वर्षातून चार अपडेट्स येतील. त्यामुळे आता यापुढे येणाऱ्या विंडोजमध्ये संपूर्णपणे वेगळे असे काही नसेल.
सर्व काही कनेक्ट होणार
आर्टिफिशल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आदी तंत्रज्ञान वापरून भविष्यात मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या आधारे ऑटोमेशन क्षेत्रात काम करेल. उदाहरणार्थ, तुम्ही फोनवर बोलत आहात आणि तुम्ही बोलता बोलता कारमध्ये बसलात, तर तुमच्या कारला हे कळायला हवे कि ड्रायव्हिंग करताना कॉल मोबाइलवर नव्हे, तर कारमधील स्पीकर वर चालला पाहिजे, आणि तशी कृतीदेखील घडली पाहिजे.
तुमचा सगळा डेटा हा क्लाउडवर, म्हणजेच इंटरनेटवर असेल. यामुळे तुम्ही कुठूनही, कोणत्याही डिवाइसवरून तुमचा डेटा अॅक्सेस करू शकाल. त्यामुळे प्रत्येक वेळेस डेटा सेंटर्स, सर्वर्स किवा स्टोरेज ड्राइव वापरण्याची गरज भासणार नाही.
____________________________________________________________________________________________________________
🎯🎯डिलीट एसएमएस परत मिळवा
Maharashtra Times | Sep 27, 2015, 12.06 AM IST
अतिशय महत्त्वाचा असणारा एसएमएस चुकून जर नष्ट झाला, तर खूप मनस्ताप होण्याची शक्यता असते. मात्र, आता मनस्ताप करून घेण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे जर अँड्रॉइड स्मार्टफोन असेल, तर डिलीट केलेला एसएमएस परत मिळण्याची शक्यता आहे. या पद्धतीद्वारे एसएमएस परत मिळेलच याची १०० टक्के खात्री देता येत नाही, पण प्रयोग करायला काय हरकत आहे.
कम्प्युटरवर फाइल डिलीट केल्यानंतर ती ट्रॅशमध्ये जाते. त्याचप्रमाणे अँड्रॉइड स्मार्टफोनवरून डिलीट केलेली फाइल उपकरणाच्या ट्रॅशमध्ये जाते. एखादी फाइल अथवा एसएमएस अँड्रॉइड स्मार्टफोनवरून नष्ट केल्यानंतर काही काळ ती स्मार्टफोनमध्ये तशीच पडून राहते. डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून यूजर नष्ट झालेली फाइल अथवा एसएमएस परत मिळवता येऊ शकततो. हे सॉफ्टवेअर स्मार्टफोन स्कॅन करून डिलीट झालेल्या फाइलचा शोध घेतो. अँड्रॉइड डेटा रिकव्हरी, डॉ. फोन यांसारख्या अॅपच्या माध्यमातून डिलीट झालेला मजकूर परत मिळवता येऊ शकतो. सर्व मोबाइल सेवा पुरवठादारांना तुम्ही पाठवलेले मेसेज सांभाळून ठेवणे कायदेशीर दृष्टिकोनातून् गरजेचे आहे. त्यामुळे एखादा मेसेज तुमच्याकडून चुकून डिलीट झाल्यास तुम्ही कंपनीकडूनही मागवू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे देण्याची आवश्यकता आहे. गरज पडल्यास ही कागदपत्रे कोर्टातही सादर करावी लागू शकतात. पोलिस किंवा अन्य कायदेशीर संस्थांकडून मागितल्यानंतर अशा पद्धतीची माहिती देणे आवश्यकच होऊन बसते. तुम्ही ज्यावेळी नवीन स्मार्टफोन खरेदी करता, त्याचवेळी एसएमएस बॅकअपचेही अॅप देण्यात येते. या अॅपच्या माध्यमातून मेसेज साठवून ठेवता येऊ शकतात.
सध्या अॅपस्टोअरवर एसएमएस अथवा फाइल नष्ट झाल्यानंतर ते परत मिळविण्यासंदर्भातील अनेक अॅप उपलब्ध आहेत. मोबाइलमधून एसएमएस नष्ट झाल्यानंतर तो काही काळ उपकरणात तसाच राहतो. ठरावीक वेळेनंतर तो कायमस्वरूपी नष्ट होतो. मात्र, या मधील वेळेत संबंधित अॅपचा वापर केल्यास तो पुन्हा मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे एसएमएस नष्ट होऊन मनस्ताप करीत बसण्यापेक्षा तो परत मिळविण्याचा प्रयत्न करणे, जास्त महत्त्वाचे आहे.
____________________________________________________________________________________________________________
वेळ वाचविणाऱ्या उपयुक्त ८ टिप्स
Maharashtra Times | Sep 27, 2015, 12.22 AM IST
हल्लीचा जमाना गॅजेट्सचा आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक कामात गॅजेट्सचा वापर अनिवार्य ठरतो आहे. पर्सनल कम्प्युटरपासून डेस्कटॉप, टॅब्लेट ते हातोहात दिसणाऱ्या स्मार्टफोनपर्यंत प्रत्येक गॅजेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या गॅजेटद्वारे दैनंदिन कामे करणाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांवर मात करण्याविषयी सांगताहेत हितेशराज भगत आणि करण बजाज..
अॅप लाँचर्स
दैनंदिन कामे पर्सनल कम्प्युटरवर करणाऱ्यांना आपली कामे अधिक वेगवान आणि स्मार्ट पद्धतीने व्हावी, असे वाटत असेल तर त्यांनी अॅप लाँचरचा उपयोग करण्यास हरकत नाही. पर्सनल कम्प्युटरवर (विंडोज, मॅक किंवा लिनक्स) www.launchy.net या वेबसाइटवरून लाँची हे लाँचर मोफत डाउनलोड करावे. लाँची हे ओेपनसोर्स कीस्ट्रोक लाँचर असून, त्याद्वारे कोणताही प्रोग्रॅम असो काही सेकंदातच सुरू होण्यास मदत होते. कम्प्युटरवर सेव्ह करण्यात येणाऱ्या फाइल्सची या लाँचरच्या माध्यमातून फोल्डर आणि डॉक्युमेंट्सच्या स्वरूपात विभागणी करण्यात येते. त्यामुळे कोणत्या फाइलमध्ये नेमके काय ठेवले आहे, किंवा ती नेमकी कोठे आहे हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता भासत नाही. जर तुम्ही ग्राफिकचा अंतर्भावर असणारा पर्याय शोधत असाल, तर तुम्ही रॉकेटडॉकचा अवलंब करू शकता. www.rocketdock.com या वेबसाइटवर जाऊन हे सॉफ्टवेअर मोफत डाउनलोड करा. त्यानंतर रॉकेटडॉकच्या मदतीने डेस्कटॉपवरील विविध गरजेची आयकॉन विविध आकर्षक पद्धतीने मांडता येऊ शकतात. यातील अॅनिमेशनचा भाग तुम्ही हव्या त्या पद्धतीने बदलू शकता. मॅकच्या कम्प्युटरमध्ये उपलब्ध असणारा मल्टिपल डेस्कटॉपचा पर्याय विंडोज कम्प्युटरमध्ये वापरण्यासाठी डेक्स्पॉटचा पर्याय जरूर उपयोगात आणावा. www.dexpot.com या वेबसाइटवर हे वैशिष्ट्यपूर्ण लाँचर उपलब्ध आहे. त्यातील उपलब्ध पर्यायांच्या माध्यमातून तुम्ही एकाचवेळी अनेक व्हर्च्युअल डेस्कटॉप वापरू शकता.
शॉर्टकट जाणून घ्या
कीबोर्डवरील शॉर्टकट माहिती असणे, हा कामातील वेळ वाचविण्याचा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. प्रत्येक प्रोग्रॅममध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शॉर्टकट असू शकतात. तुम्ही जर विंडोज पीसी वापरत असाल, तर त्यावरील शॉर्टकीज www.transglos.com या वेबसाइटवरून समजावून घेता येतील. मॅकवरील शॉर्टकीज www.cheatsheetapp.com या वेबसाइटवरून घेता येतील. किंवा www.veodin.com या वेबसाइटवरूनही शॉर्टकीज घेता येतील. एका दृष्टिक्षेपात एकाचवेळी किमान २०० विंडोजच्या शॉर्टकीज http://goo.gl/JCmisr येथून घेता येतील. अशाच पद्धतीची यादी मॅक पीसीसाठी http://goo.gl/u1uAxl येथून घेता येतील. बहुतांश कीज लक्षात येतीलच असे नाही, त्यासाठी संबंधित वेबसाइटवरून शॉर्टकीजच्या यादीची प्रिंटदेखील काढता येईल.
मोबाइलच्या कॅमेऱ्याचा वापर करा
काही कारणांस्तव तुम्ही विदेशात गेला असाल आणि तेथील स्थानिक भाषेशी जुळवून घेण्यात अडचणी येत असतील, तर फारच अडचण होते. तेथील माहितीदर्शक फलकही समजून घेण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही तेथे आपली भाषा समजणाऱ्या व्यक्तीचीच मदत घ्याल..बरोबर ना. समजा तेही उपलब्ध न झाल्यास गुगल ट्रान्सलेट अॅपची मदत घेता येईल. मात्र, त्यासाठी मूळ भाषा आणि भाषांतरीत मजकूराच्या भाषेची योग्य निवड करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ..जर्मन टू इंग्लिश. त्यानंतर मोबाइलचा कॅमेरा सुरू करा. त्यानंतर संबंधित दिशादर्शक अथवा माहितीदर्शक फलकाच्या बरोबर समोर कॅमेरा धरा. कॅमेरा योग्य जागी धरल्यानंतर क्षणात जर्मन भाषेतील मजकुराचे काही सेकंदांतच रूपांतर इंग्लिशमध्ये झाल्याचे दिसून येईल. या कामासाठी तुमच्याकडे थ्रीजी किंवा फोरजी डेटा सेवा असणे आवश्यक आहे. या शिवाय मोबाइलच्या कॅमेऱ्याचा वापर स्कॅनर म्हणूनही करता येईल. त्यासाठी मोफत उपलब्ध असणारे ऑफिस लेन्स अॅप डाउनलोड करा. त्यानंतर कॅमेऱ्यातून टिपलेल्या मजकुराचे स्कॅनिंग करणे शक्य क्य होईल. एखादे पुस्तक किंवा पेपरवरील मजकूरही स्कॅन करता येणे शक्य होईल. हे अॅप तुमच्या कॅमेऱ्यावर आपोआप ओपन होईल, त्यानंतर तुम्ही केवळ बटन दाबायचा अवकाश...मजकूर स्कॅन होईल. जर तुम्ही 'डॉक्युमेंट' या पर्यायाचा अवलंब केल्यास अॅप स्वतःहून संबंधित मजकूर क्रॉप करेल आणि त्याचे स्कॅन करेल. हा स्कॅन केलेला मजकूर तुम्ही कोणालाही शेअर करू शकता.
पोर्टेबल अॅप्सचा उपयोग करा
डेस्कटॉप किंवा कम्प्युटरच्या मदतीने काम करत असाल, तर बऱ्याचदा कामांसाठी उपयुक्त सॉफ्टवेअर डाउनलोड करता येत नाहीत किंवा डाउनलोड करण्यात अडचणी येतात. त्यासाठी पोर्टेबल अॅपचा वापर करणे कधीही उत्तम. ही पोर्टेबल अॅप www.portableapps.com येथून इन्स्टॉल करता येऊ शकतात आणि यूएसबी फ्लॅश ड्राइव्हला सेव्ह करता येऊ शकतात. त्यानंतर पाहिजे तेथे ही अॅप वापरता येऊ शकतात. खरं पाहता ही पोर्टेबल अॅप डाउनलोड करण्याची आवश्यकता नसते. ही अॅप फ्लॅशड्राइव्हच्या माध्यमातून कार्यरत राहतात. तुम्ही तुमची सर्व आवडती सॉफ्टवेअर्स उदाहरणार्थ..वेब ब्राउजर, मीडिया प्लेयर, क्लाउड स्टोरेज, डॉक्युमेंट एडिटर्स आणि गेम्स आदी.. फ्लॅशड्राइव्हर ठेवू शकता. कम्प्युटरचा वापर करताना त्यांचा सहज वापर करता येऊ शकतो. या शिवाय तुमची डॉक्युमेंट्स, कस्टमाइज्ड सेटिंग, बुकमार्क आणि विविध प्रोग्रॅमची एक्स्टेंशन फ्लॅश ड्राइव्हवर घेता येऊ शकतात.
स्पॅम नष्ट करा
दीर्घकाळपासून एकच ई-मेल सेवा वापरणाऱ्या यूजरना ठरावीक कालावधीनंतर इनबॉक्समध्ये मोठ्या संख्येने स्पॅम मेल जमा झालेले दिसतात. दैनंदिन गरजेच्या ई-मेलपेक्षा स्पॅम मेलचे प्रमाण अधिक असेल, तर ते तुमच्या इनबॉक्सची मोठ्या प्रमाणावर जागा व्यापतात. तसेच, ते डीलिट करण्यासाठी बराचसा वेळ खर्ची पडतो. असे बिनकामाचे मेल वेळ न घालवता डीलिट करण्यासाठी www.unroll.me या वेबसाइटचा उपयोग करता येईल. ही सेवा इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा पूर्ण इनबॉक्स स्कॅन करते आणि त्यानतंर काही मिनिटांतच तुम्हाला सातत्याने येणाऱ्या स्पॅममेलची एक यादीच समोर ठेवली जाते. त्यानंतर नकोशा असणाऱ्या ई-मेलची निवड करून ते मेल कायमस्वरूपी बंद केले जाऊ शकतात. मोठ्या संख्येने येणारे स्पॅम मेल नष्ट करण्यासाठी बराच वेळ खर्ची पडू शकतो. मात्र, अनरोलच्या सेवेचा उपयोग करून चुटकीसरशी ते नष्ट करता येतात.
की बोर्ड चांगला वापरा
संवाद आणि कामाच्या दृष्टीने सध्या वापरात असणारे स्मार्टफोन खूपच उपयुक्त आहेत. कम्प्युटरप्रमाणेच स्मार्टफोनवरूनही टायपिंग करताना वेग वाढवता येऊ शकतो. अँड्रॉइड आणि आयओएसवरही टायपिंग करण्यासाठीचे विविध की बोर्ड सध्या उपलब्ध आहेत. अँड्रॉइड आणि आयओएसधारकांसाठी आम्ही 'स्विफ्ट कीबोर्ड'सारखा चांगला कीबोर्ड सध्या उपलब्ध आहे.
नकोशा जाहिराती काढून टाका
तुम्ही स्मार्टफोनच्या माध्यमातून वेब ब्राउजिंग करीत असाल, तर बऱ्याच वेळा मध्येच जाहिराती ओपन होत असल्याचे दिसून येते. सातत्याने येणाऱ्या या नकोशा जाहिरातींमुळे बराचसा वेळ वाया जातो. बऱ्याचदा जाहिरातींबरोबर नकोसे पॉप अप, ऑटो प्ले व्हिडिओ जाहिरातींसोबत मालवेअरही येण्याची शक्यता असते. हा त्रास टाळायचा असेल, तर अॅड ब्लॉकरचा उपयोग करावा लागेल. अँड्रॉइड वापरणाऱ्यांनी Eyeo चा अॅडब्लॉक ब्राउजर डाउनलोड करावा. ब्राउजिंग करताना सातत्याने होणाऱ्या जाहिरातींचा मारा थोपविण्यासाठी 'अॅपल'नेही अशा प्रकारचे ब्राउजर तयार करण्यास सुरुवात केली आहे. 'आयफोन'चा वापर करणाऱ्यांनी 'अॅपस्टोअर'मधून वनब्लॉकर, क्रिस्टल आणि के९ आदी ब्राउजर डाउनलोड करून वापरण्यास हरकत नाही. अशा अॅडब्लॉकरमुळे नकोशा असणाऱ्या जाहिराती काढून टाकता येतात, मात्र ज्या जाहिराती खऱ्याच आवश्यक आहेत त्या ठेवता येतात. या अॅडब्लॉकची पेड व्हर्जन घेतल्यास त्या द्वारे नकोसे मेसेज आणि कॉल्सही ब्लॉक करता येतात. अँड्रॉइड वापरत असाल, तर ट्रूकॉलर आणि ट्रूमेजेंजरचाही उपयोग करणे सहज शक्य आहे. या दोन अॅपच्या मदतीने तुमचा बराच वेळ वाचू शकतो. आयओएसचा वापर करीत असाल, तर तुमच्यासाठी अतिशय मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पहिल्यापासूनच कॉल अथवा मेसेज ब्लॉकिंगची सुविधा उपलब्ध आहे.
वेगवान टायपिंग करा
आपल्यापैकी अनेक जण कम्प्युटरवर दैनंदिन टायपिंग करीत असतील. टायपिंग हे अशा पद्धतीचे काम आहे, की ज्यामध्ये दैनंदिन बराच वेळ वाया जातो. त्यातही तुम्ही कोणता की बोर्ड वापरता, त्यावरही ते अवलंबून आहे. तुम्ही कोणता आणि कसा की बोर्ड वापरता यावरही वेळेचे गणित अवलंबून असते. टायपिंगचा वेग वाढावा, या साठी दोन पद्धतींचा प्रामुख्याने अवलंब करण्यात येतो. ऑनलाइन आणि डाउनलोड करण्यात येणारी सॉफ्टवेअर अशा या दोन पद्धती आहेत.
वेबसाइट
इंटरनेटच्या महाजालात टायपिंगचा सराव करण्यासाठी आणि वेग वाढविण्यासाठी अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत. या कामासाठी आम्हीwww.keybr.com ही वेबसाइट सुचवू इच्छितो. टायपिंगच्या सरावाचा श्रीणगेशा करण्यासाठी ही वेबसाइट अत्यंत उपयुक्त आहे. कीबरचा वापर करीत असताना तुम्ही टाइप केलेला मजकूर आणि त्यासाठी लागणारा वेळ याचीही मोजणी करण्यात येते. तुमच्या टायपिंगचा वेग आणि तुम्ही केलेल्या चुकाही या वेबसाइटच्या माध्यमातून तुम्हाला दाखविल्या जातात. www.typingweb.com या वेबसाइटच्या माध्यमातूनही टायपिंगचे काम केले जाऊ शकते. टायपिंगचा सराव करण्यासाठी ही वेबसाइटदेखील उपयुक्त आहे. तुमचा टायपिंगचा वेग आणि त्यातील चुका यांचे विश्लेषण करण्याचे कामही ही वेबसाइट करते.
सॉफ्टवेअर
वेबसाइटचा वापर करण्यापेक्षा सॉफ्टवेअरचा वापर करणे अधिक श्रेयस्कर असेल, तर तुम्ही www.nchsoftware.com या वेबसाइटवरून विंडोज आणि मॅक पीसीसाठी उपयुक्त ट्युटर डाउलोड करू शकता. या सोबतच उपयुक्त गाइड
उपलब्ध होते. या गाइडच्या माध्यमातून वेगवान टायपिंगसाठी उपयुक्त माहिती प्राप्त होऊ शकते. हळूहळू सराव केल्यानंतर काही दिवसांनी कीबोर्डकडे न पाहताही तुम्ही वेगाने आणि बिनचूक टायपिंग करू शकाल
____________________________________________________________________________________________________________
व्हॉट्सअॅपचे रंग हजार
Maharashtra Times | Sep 29, 2015, 12.40 AM IST
ऋजुता कुलकर्णी, कॉलेज क्लब रिपोर्टर
व्हॉट्सअॅपशिवाय आता आपलं पानही हलत नाही. पण या अॅपचा स्मार्ट वापर करण्यासाठी काही ट्रिक्स आपल्याला माहिती असतातच असं नाही. त्याचविषयी...
लास्ट सीन आहे तसंच ठेवणं -
इंटरनेट बंद करुन व्हॉट्सअॅपवर मेसेज टाइप करुन पाठवला आणि मग व्हॉट्सअॅप बंद करुन इंटरनेट चालू केलं तर लास्ट सीन पूर्वी होता तोच राहतो. बदलत नाही.
फोन नंबरशिवाय व्हॉट्सअॅप वापरणं -
व्हॉट्सअॅप डाउनलोड केल्यावर मोबाइल फोन 'फ्लाइट मोड' वर ठेवून व्हेरिफिकेशन मेसेज ब्लॉक करा. यानंतर व्हेरीफाय थ्रू इमेल हा पर्याय निवडून इमेल आयडी टाका आणि सेंडिंग मेसेज कॅन्सल करा. अशाप्रकारे फोन नंबरशिवायही आपण व्हॉट्सअॅप वापरू शकतो.
आपला मेसेज नेमका किती वाजता वाचलाय हे पाहणं -
मेसेजवर लाँग प्रेस करा. मग उजवीकडच्या कोपऱ्यातला 'i' पर्याय निवडा. त्यावर हा मेसेज किती वाजता वाचला गेला आहे, हे कळेल.
काँटॅक्ट ब्लॉकिंग कसं ओळखावं? त्या व्यक्तीला एखाद्या ग्रूपमध्ये अॅड करण्याचा प्रयत्न करा. ते होत नसेल तर त्याने तुम्हाला ब्लॉक केलं आहे, हे समजून जा.
डिलीटेड मेसेज वाचण्यासाठी काय करावं? -
व्हॉट्सअॅपच्या डेटाबेस फोल्डरमध्ये जा. त्यात 'msgstore-2014-01-04.1.db.crypt' आणि 'msgstore.db.crypt' अशा दोन फाइल्स दिसतील. त्यापैकी दुसरी फाइल 'backup-msgstore.db.crypt.' या नावाने सेव्ह करा. या नंतर मेसेज असलेली फाइल 'msgstore.db.crypt' या नावाने सेव्ह करा. आता सेटिंग्स-अप्लिकेशन्स-मॅनेज अॅलिकेशन्स-व्हॉट्सअॅपमध्ये जाऊन क्लीअर डेटावर क्लिक करा. व्हॉट्सअॅप ओपन करुन बॅकअप रिस्टोअर करा.
दुसऱ्याचा डीपी बदलणं - हे तुम्हाला सहज करता येतं. पण फक्त तुमच्याच फोनसाठी. ५६१x५६१ आकाराचा एक फोटो एसडीकार्डमध्ये सेव्ह करा आणि तुमच्या मित्राचा फोन नंबर वापरून तो रिनेम करा.
फोन नंबर बदलणं - यासाठी सेटिंग्ज > अकाउंट > चेंज नंबर या मार्गाने जा.
ब्लू टिक्स नाहीशा करणं - यासाठी सेटिंग्ज >अकाउंट > प्रायवसीमध्ये जाऊन 'रीड रेसिपीयंटचा पर्याय डिसेबल करा.
काही गमतीदार गोष्टी
हल्ली व्हॉटस्अॅपवर काही फसवे मेसेजही दिसतात. म्हणजे चित्र दिसतं एक आणि त्यावर क्लिक केल्यावर ओपन मात्र भलतंच चित्र होतं. ही किमया आहे, एफएचयू अॅप (fhuapp)आणि मॅजिअॅप (magiapp)ची.
व्हॉट्सअॅपवर आपण नेमका किती वेळ घालवतो, कोण आपली प्रोफाइल सगळ्यात जास्त वेळा पाहतं, हे सगळं समजण्यासाठी व्हॉट्सस्टेट हे अॅप वापरता येतं.
एखाद्या खास मित्राला एका विशिष्ट वेळेला काही मेसेज पाठवायचा असेल तर त्यासाठी व्हॉट्सअॅप मेसेंजर शेड्युलर लाइट (Whatsapp messenger scheduler lite) हे अॅप वापरता येईल.
व्हॉट्सडॉग या अॅपमुळे आपली प्रिय व्यक्ती कधी ऑनलाइन येते, हे सहज कळून येईल.
व्हॉट्सटूल्स या अॅप्लिकेशनद्वारे आता आपण १ जीबीपर्यंतची पीडीएफ फाइल पाठवू शकतो.
____________________________________________________________________________________________________________
अब दो फोन में इस्तेमाल करें एक ही WhatsApp अकाउंट
ibnlive.com 11:01 AM IST Nov 03, 2015
नई दिल्ली। सभी वॉट्सऐप अकाउंट एक ही नंबर पर एक ही फोन पर चलाए जाते हैं यानि कि आप एक नंबर से बनाए गए वॉट्सऐप अकाउंट को केवल एक ही फोन पर चला सकते हैं। लेकिन अब आप एक ही नंबर से दो मोबाइल फोन पर वॉट्सऐप का इस्तेमाल कर सकते हैं।
Comments
Post a Comment