* ध्वजसंहिता
ध्वजसंहिता 1) डोक्यावर शिरस्त्राण (टोपी) असो अगर नसो सर्वांना सॅल्यूट करून मानवंदना देता येईल. 2) ध्वजाच्या घडीत फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील. 3) कोणत्याही व्यक्तिला आपल्या संस्थांवर/ कार्यालयांवर ध्वजाचा मान राखून ध्वजारोहन करता येईल. (सूर्योदयानंतर ध्वजारोहन व सूर्यास्तापूर्वी ध्वजावतरण करावे.) 4) ध्वजापेक्षा जास्त उंचावर कोणतीही पताका लावू नये. ध्वजप्रतिज्ञा "मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम,समाजसत्तावादी, धर्मनिरपेक्ष,लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे." ध्वजारोहन क्रम 1) ध्वजारोहन/ध्वज फडकवणे 2) राष्ट्रीय सलामी 3) राष्ट्रगीत 4) ध्वजप्रतिज्ञा 5) ध्वजगौरव गीत याप्रमाणे क्रम असावा. *****!!!!!*****: राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. क...