* दप्तरमुक्त शनिवार

दप्तरमुक्त शनिवार
My School,My Activity 

दप्तर मुक्त शनिवार
”दप्तरमुक्त शनिवार”
हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला.
विद्यार्थी व पालकांनी दाखवलेल्या जबरदस्त उत्साहामुळे हा उपक्रम पुढे दर शनिवारी राबविण्याचे ठरवले.

शनिवारी अर्धा दिवस शाळा भरते.
शनिवारी
होणा-या तासांसाठी फक्त भाषेची दोन पुस्तके विद्यार्थ्यांना शुक्रवारीच शाळेत ठेवण्यास सांगतीले.

हसत, खेळत, आनंदमय व ज्ञानरचनावादी शिक्षण व्हावे या उद्देशाने विद्यार्थी,पालकांना व शा.व्य.समितीला “दप्तरमुक्त शनिवार” याची माहिती अगोदरच देऊन या दिवशी चालणार-या कामकाजाचे नियोजन करून परवानगी घेण्यात आली.

प्रत्येक दप्तरमुक्त शनिवारचे आलटून पालटून घ्यावयाचे उपक्रम :-
परीपाठ
योगासने
कवायत
वाचन कार्ड द्वारे प्रकट वाचन
वैयक्तिक,सामूहिक मराठी,इंग्रजी व हिंदी कविता गायन
विविध खेळाच्या स्पर्धा
नृत्य स्पर्धा
सामान्य ज्ञान मार्गदर्शन
वर्ग, मैदान व शालेय परीसर स्वच्छता
चांगल्या सवयी मार्गदर्शन
पुरक आहार व शा.पो.आहार वाटप
चालू आठवड्याचे अनुधावन
 शिक्षकांची बैठक व पुढील आठवडयाचे नियोजन.

इत्यादी .

”विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ्याला एक दिवस आराम.”

🏻🏻🏻

Comments

Popular posts from this blog

* ई.1 ली ते 8वी साठी प्रकल्प यादी