* सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना
१ )नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक आपल्या मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात .
२ ) पालक एका मुलीच्या नावे एकच खाते उघडू शकतात आणि जास्तीत जास्त दोन मुलींच्या नावे खाते उघडू शकतात .
३ )सदर खात्यासाठी पालक ठेवीदार आणि मुलगी खातेदारक असेल .
४) मुलीच्या जन्मापासून ते मुलीच्या वयाच्या १० वर्षापर्यंत खाते उघडता येते.
५ )खाते उघडण्यासाठी पालकांची kyc कागदपत्रे (ओळख पत्र,पॅन कार्ड ,डॉयव्हिंग लायसन्स,आधार कार्ड),पत्त्याचा पुरावा (रेशन कार्ड ,आधार कार्ड )व मुलीचा जन्माचा दाखला आवश्यक .
६)या खात्यांना वारस नोंदणीची सुविधा नाही.
७ )खाते कमीत कमी १०००/-रुपयाने उघडावे व नंतरची रक्कम १०० /- च्या पटीत खात्यात जमा करावी.
८ )एका वित्तीय वर्षाला जास्तीत जास्त १५०००० /-रुपये जमा करता येतील .
९ )महिन्याला किंवा वर्षातून कितीही वेळा रक्कम जमा करता येईल.(बचत खात्याप्रमाणे )
१० )वर्षाला कमीत कमी १००० /-रुपये जमा करायला हवेत .नाहीतर खाते खंडित होते .खंडित खाते पुन :पुनर्जीवित करण्यासाठी ५० /-रुपये दंड प्रतिवर्ष आणि त्या वर्षापर्यंतची कमीत कमी रक्कम भरावी लागेल .
११) जमा रक्कम रोखीने /धनादेश /धनाकर्षाने करता येईल .धनादेश /धनाकर्ष ची सरकारी खात्यात जमेची तारीख हि खात्याची जमा तारीख ग्राह्य धरण्यात येईल.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या post ऑफिस ला आजच भेट द्या .
Comments
Post a Comment